Friday, June 24, 2011

पाऊस मुंबईतला आणि मुंबईकरांच्या मनातला !!!

पाऊस म्हणजे गाड्या 'लेट'...
पाऊस म्हणजे कपड्यांना चिखलाची भेट!

पाऊस म्हणजे सैरभैर पक्षी आणि घोंघावणारा वारा...
पाऊस म्हणजे 'नरीमन पॉइंट' आणि उधाणलेल्या लाटा!

पाऊस म्हणजे विजांचा लखलखाट...
पाऊस म्हणजे ओल्या मातीचा घमघमाट!

पाऊस म्हणजे कोसळणार्‍या सरी वेड्या...
पाऊस म्हणजे डबक्यात सोडलेल्या कागदी होड्या!

पाऊस म्हणजे कोळ्याच्या जाळ्यावर थेंबांची नक्षी...
पाऊस म्हणजे खिडकीच्या आडोश्याला आलेले पक्षी!

पाऊस म्हणजे कोवळी नाजुक सकाळ...
पाऊस म्हणजे हवीहवीशी रोमॅंटीक संध्याकाळ!

पाऊस म्हणजे 'हिरवळ'...
पाऊस म्हणजे 'जल-निर्मळ'!

पाऊस डोळ्यात साठवू...
पाऊस मनात रूजवू...
पाऊस ऐकू...
पाऊस अनुभवू...

पाऊस म्हणजे मनाच्या कोपर्‍यात रूतून बसलेली आठवण...
पाऊस म्हणजे हळव्या नाजूक क्षणांची साठवण!

पाऊस म्हणजे चैतन्यात न्हालेल्या दिशा दहा...
पाऊस म्हणजे चिंब संध्याकाळ आणि हातात वाफाळता चहा!

- रसिका जोशी

Tuesday, April 5, 2011

साधं, सरळ आणि सोप्पं जगायचय यार !!!

Want to live a simple life........

I want to live a simple carefree life!! But It doesn't mean I am less Ambitious... The kind of rat race going around is sucking all the simple, Beautiful things from our life... We don't have time to have a cup of tea with friend, we cant chat with our parents as we are tired after the busy day!! Excellence in work, in studies is needed but not at the cost of peace in life! Isn't it? So stop for a while, take a breath, find out what exactly you want......


साधं, सरळ आणि सोप्पं जगायचय यार!

आजकाल साधं, सरळ, सोप्पं असा काही दिसतच नाही!
जो तो विचारतो किती 'Marks', कोणती 'Grade', किती 'Salary' मिळवताय राव?

कधीतरी करा की आमच्या 'B' Grade चं कौतुक!
कधीतरी म्हणा वा! शाब्बास! आमच्या ७५ टक्क्यांना!

सगळ्यांनीच पहिलं यायला हवं का?
सगळ्यांनीच 'Reality Show' चा 'Hero' असायला हवं का?

मित्रांच्या जमलेल्या मैफिलीत कुठे लागतो 'स्वर्गीय' गळा?
'Dj Night' किंवा लग्नाचा वरातीत कुठे लागते 'अशक्य' नृत्यकौशल्य?

सरळ, साध्या, सोप्प्या, अशा खुप गोष्टी आनंद देतात...
जीवघेण्या स्पर्धेतून थोडं बाजूला होऊया...
आपण आपल्याला शोधुया...
मग लक्षात येईल रोजच्या जगण्यात किती आनंद दडलाय!

- रसिका जोशी