Thursday, November 28, 2013
दु:ख, आघात, अपेक्षाभंग या म्हणाव्या तितक्या नकारात्मक गोष्टी नाहीयेत.... जितकी गरज तीव्र सुख अनुभवण्याची असते तितकीच गरज तीव्र दु:ख अनुभवण्याची आणि ते पचवून त्यातून सही सलामत बाहेर पडण्याची असते... अशा घटना आपल्याला आधीपेक्षा जास्त शहाणे करतात आणि एक नवीनच झळाळी आणतात!!
 

- रसिका

Wednesday, November 20, 2013

Dedicated to my near and dear ones...... :)तू आहेस म्हणून माझ जगणं सुंदर, सुसह्य आहे... एरवी इतक्या मोठ्या जगात आपले काही थोड्याच लोकांशी जमते... प्रचंड आवडणारी अशी काही मोजकीच जिव्हाळ्याची लोकं आपल्यासोबत असतात.. त्यात तू मला भेटावस, लाभावस हे माझे केवढे भाग्य! या पेव्हर्स ब्लॉक्स सारखेच आपले बंध घट्ट एकमेकांत गुंतलेले आहेत... काही नाती आपोआप जन्मत: मिळतात.. काही स्वप्रयत्नाने तर काही निव्वळ योगायोगाने... पण तरीही कुठल्याही नात्याचे महत्व तसूभरही कमी होत नाही! माझया लहानसहान आनंदातला, सुख दु:खातला सोबती, कधी माझे नुसते ऐकून घेणारा तरी कधी मला चार गोष्टी ऐकवणारा... काही भेदरलेल्या, प्रचंड खचलेल्या क्षणी पाठीशी उभा राहीलेला तू... तर कधी नुसती पाठीवर थाप टाकून प्रेमाचा प्रचंड वर्षाव करणारा तू... मला हवा आहेस आयुष्यभर!!