Tuesday, December 23, 2014

Generation Gap!


''You are the sweetest person I have ever met !'' असं एका १५ वर्षाच्या ओळखीच्या मुलीनी तिच्या एका मित्रासाठी फेसबूक वर लिहिलेल वाचलं आज! दोघांनी एकमेकांबरोबरचे फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवल्येत. कमाल आहे! यांच्या वयाचे असताना आपण इतके बिनधास्त नव्हतो! गोष्टी खूप सोप्प्या झाल्येत या जेनरेशन साठी! माझ्या आणि माझ्या आई बाबांच्या पिढीतली Generation Gap स्वभावीक आहे.. पण माझ्याहून केवळ १० एक वर्ष लहान असलेल्या मुलांच्या आणि माझ्या पिढीमधे इतका फरक पडावा?? कुणाविषयी तरी स्वाभाविक आकर्षण वाटण्याच्या वयात असलेली ती मुलगी; ते आकर्षण इतक्या बिनधास्त जग जाहीर करत्ये याच आश्चर्य वाटत... कदाचित या गोष्टी इतक्या गंभीरपणे घेण्याच्या नसाव्यात त्यांच्या दृष्टीनी.. पण म्हणजे चांगल्या वाईटाच्या संकल्पनाच बदलत चाल्ल्येत का? की विचार परिपक्व होण्याची वाट न पाहाता या गोष्टींमधे पडणं हे " कूsssल " वाटतं यांना? नवीन पिढीला ( असं त्यांना संबोधताना खरच खूप त्रास होतो आतून ;) ) दोष द्यायचा हेतू अजिबातच नाहीये पण ही मानसिकता समजून घ्यायचा प्रयत्न आहे! :)

2 comments:

 1. Replies
  1. सौरभ, मी ही पोस्ट माझ्या एका मित्राला पाठवली तेव्हा त्याच्याशी झालेल्या चर्चेतून मला समाधानकारक उत्तर मिळाले. आमचे संभाषण मी इथे पोस्ट करत्ये.... :)

   Friend: such changes are part of life. Change cannot be interrupted.

   Me: amm hmm..
   but I m not at all interrupting in her life. मला इतकच वाटतय की ही मुलं खूप घाई करतात.. त्यांना सगळच खूप लवकर लवकर हवाय. मला खात्री आहे की मागची पिढी देखील असाच काहीसा विचार करत असेल आपल्याबद्दल.
   मला वाटत की प्रत्येक पिढीचा स्ट्रगल वेगवेगळा आहे.. मी प्रत्येक गोष्ट स्व कष्टानी घेतल्ये. दीड लाखाचा कॅमेरा असो की 60 हजाराची लेन्स.. अजूनही साधा फोन वापरते.. पण या मुलांना सातवी आठवीतच टॅब मिळतो.. हे काहीसं खटकतं..
   वेग वाढत जातोय आयुष्याचा अस वाटतय..
   आयुष्याचा.. किंवा एजिंग चा..

   Friend: Hmmm....I agree. When I said change cannot be interrupted, I meant you and me do not have control over these things. I understand your concern and what you are saying is also right. But look at it this way - a student in 7th standard gets a tab. You and I did not get it. But still, we got something in 7th standard which some other kid did not get. What I mean is, such disparity has always been there. But it is true that one must learn to 'earn' things. It is dangerous to have everything served on the platter.

   Delete