Tuesday, January 28, 2014

तू... मी... हे मेघ...


मेघ का बरं रूसले असतील आज?
नेहमीप्रमाणे संध्याकाळी मला सोबत करायला आल्येत खरे;
पण नुसत्याच येरझारा घालतायात... अस्वस्थ....
तू आजही येणार नसल्याची चाहूल लागली असेल का त्यांना?
मी मात्र तू येशील ही आशा विझू न देता, नेमाने रंगवते तुझ चित्र!
पण या चित्रातल्या तुला कळतील का माझ्या मनीचे रंग?
माझा ठावठिकाणा शोधत येशील का तू पावसाळी संध्याकाळी कधी?
मी अन् हे कृष्णमेघ दोघेही वाट पाहतोय तुझी...
''प्रेमवर्षाव'' करण्याकरता...

- रसिका