Monday, September 29, 2014

लग्न लग्न २



फोन वर एक इसम: ( अनुनासिक स्वरात )...  नमस्कार मी अ ब क बोलतोय,,,,
र: बोला
अ ब क: मी 'ग म भ' चा मेव्ह्णा!  मुलीची माहीती ब्राम्हण सभेत मिळाली... पण ती अपूर्ण आहे.. जरा पूर्ण सांगता का?
र: आधी ग म भ ची पूर्ण माहिती देता का? ( द्यायची तसदी घ्याल का? स्वत:ची माहिती सीक्रेट ठेवायची आणि दुसर्‍याची प्राथमिक माहिती असताना परत परत विचारायची!! )
अ ब क: अमुक तमुक शिकलाय अमुक तमुक नोकरी करतोय! (माहिती संपली!)
मुलीचे वडील सिनेमा इंडस्ट्री मधे आहेत का?
र: ( गोंधळून... ) नाही! काहीतरी गैरसमज होतोय तुमचा!
अ ब क: अच्छा!! माझ्या वडीलांनी चुकीची माहिती लिहून घेतली असेल!!! मुलीची माहिती सांगा..
र: आधी तुम्ही मुलाचा फोटो आणि माहिती पाठवा मला! माझा मेल आइडी आहे माहिती मधे
अ ब क: तुम्ही कोण बोलताय?
र: मी र बोलत्ये!
अ ब क: म्हणजे तुम्हीच मुलगी आहात का? (!!!) तुम्हीच लग्नाच्या आहात का? 
र: हो! माझंच नाव नोंदवलय!
अ ब क: काय नाव म्हणालात? ( !!!)
र: मी र ज बोलत्ये ! ( यांनी माझं नाव आधी सांगूनच बोलायला सुरवात केली होती ना??)
अ ब क: बर! काय अपेक्षा आहेत तुमच्या?
र: ..................  इत्यादी इत्यादी
अ ब क: (माहितीत त्याच अपेक्षा आहेत हे लक्षात आल्यामुळे कदाचीत...) तुम्ही स्वत: तुमचं नाव नोंदवलय का?
र: हो!
अ ब क: पण म्हणजे आई वडील???
र: (प्रश्नाचा रोख न कळून) हो मी आई - वडीलांबरोबरच  राहाते!
अ ब क: नाही पण म्हणजे तुम्हीच तुमचे नाव नोंदवले.... काही प्रॉब्लेम नाही ना???
(आता यात काय डोंबल प्रॉब्लेम असणार!)
र: नाही! मी स्वत: माझी माहिती चांगली लिहु शकते म्हणून स्वत:च नोंदवले!
अ ब क: (उसने हसून...) बर बर! मॅडम तुम्ही व्हाॅट्स अॅप वर आहात का? या नंबरावर ? त्यावर फोटो पाठवतो!
र: हो आहे! पाठवा... आपले नाव काय? ( आईला!! खरतर आधी सांगितले होते यांनी! )
अ ब क: (अनुनासिक स्वरात पुन्हा तीच टेप.. ) अ ब क... मुलाचा मेव्ह्णा... डोंबिवलीत राहतो... मी स्वत: नाट्य क्षेत्रात काम करतो.. ( ही नवीन माहिती! बाय द वे, मी ''स्वत:'' आणि मी यातला फरक नाही समजला मला! )!!
मी: बर बर.....

नाट्य क्षेत्रातील किंवा खरेतर कोणाही माणसाला मुलीनी स्वत: नाव नोंदवले म्हणून  इतके आश्चर्य वाटावे!! काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून असं केलय इतपत शंका यावी! कमाल आहे! पण काही असो! सक्काळी सक्काळी माझी चांगली करमणूक झाली!!  :D