पाऊस म्हणजे गाड्या 'लेट'...
पाऊस म्हणजे कपड्यांना चिखलाची भेट!
पाऊस म्हणजे सैरभैर पक्षी आणि घोंघावणारा वारा...
पाऊस म्हणजे 'नरीमन पॉइंट' आणि उधाणलेल्या लाटा!
पाऊस म्हणजे विजांचा लखलखाट...
पाऊस म्हणजे ओल्या मातीचा घमघमाट!
पाऊस म्हणजे कोसळणार्या सरी वेड्या...
पाऊस म्हणजे डबक्यात सोडलेल्या कागदी होड्या!
पाऊस म्हणजे कोळ्याच्या जाळ्यावर थेंबांची नक्षी...
पाऊस म्हणजे खिडकीच्या आडोश्याला आलेले पक्षी!
पाऊस म्हणजे कोवळी नाजुक सकाळ...
पाऊस म्हणजे हवीहवीशी रोमॅंटीक संध्याकाळ!
पाऊस म्हणजे 'हिरवळ'...
पाऊस म्हणजे 'जल-निर्मळ'!
पाऊस डोळ्यात साठवू...
पाऊस मनात रूजवू...
पाऊस ऐकू...
पाऊस अनुभवू...
पाऊस म्हणजे मनाच्या कोपर्यात रूतून बसलेली आठवण...
पाऊस म्हणजे हळव्या नाजूक क्षणांची साठवण!
पाऊस म्हणजे चैतन्यात न्हालेल्या दिशा दहा...
पाऊस म्हणजे चिंब संध्याकाळ आणि हातात वाफाळता चहा!
- रसिका जोशी
- रसिका जोशी
Hi Rasika.... It's nice composition...
ReplyDeleteShrinivas
Thank you Shrinivas :)
ReplyDelete