Thursday, January 1, 2015

रंगं भरणारी माणसं..... :)



   माझी खात्री आहे की आपल्या आजुबाजुची आणि विविध कारणांमुळे संपर्कात आलेली माणसं आपल्याला घडवत असतात, समृद्ध करत असतात! ही सर्व मंडळी आपल्यावर विश्वास ठेवतात, आपल्याला संधी देतात म्हणून आपण काहीतरी करू शकतो.. नवीन उमेद देणारी ही माणसं असतात म्हणुन अनेक बर्‍या वाईट प्रसंगांवर, लहान मोठ्या पराभवांवर आपण मात करतो... मग नाती रक्ताची आहेत की जोडलेली हा मुद्दा गौण होतो.. या फोटो मधल्या आणि त्या बाहेरच्या अनेक लोकांनी मला खूप भरभरून दिलय... काहींच्या लेखनातून, विचारांमधून, काहींच्या मार्गदर्शनातून, काहींच्या सहवासातून, वागणुकीतून, निखळ प्रेमातून, काहींशी झालेल्या संवादातून; ते conviction नी करत असलेल्या त्यांच्या कामातून तर काहींच्या मैत्रीतून मी सतत काहीतरी घेत आल्ये.. जग जर 'देणारे' आणि 'घेणारे' अशा दोन प्रकारच्या माणसांचे बनलेले असेल तर मी नक्कीच घेणार्‍यांमधे येते... कधीतरी आपल्या कामातून माझी वर्णी 'देणार्‍यांमधे' लागावी अशी इच्छा आहे... पण तोवर माझं जगणं तुमच्या प्रेमानी, मायेनी, सोबतीनी समृद्ध करणार्‍या, त्यात विविध रंगं भरणार्‍या तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा... :D

Friday, December 26, 2014

... कुछ तो बनने दो माँ!

उछल कुद करने दो मुझे
ना बंधन में बांधो मुझे माँ...

माँ, छुटकी की माँ कहेती है,
छुटकी बड़ी होके डाक्टर बनेगी !
मुझेभी तो पढ़नेदो माँ..
डाक्टर ना सही, कुछ तो बनने दो माँ!

मैने अक्सर देखा है सारा समय तुम्हे रसोई में बिताते हुए..
माँ, लेकिन स्कुल में तो मैने चार्ट पर देखा है..
टीचर, इंजिनियर, डाक्टर, परिचारिका लड़कियोको बनते हुए!
क्या यह लड़किया सिर्फ़ चार्ट पर दिखती है माँ??
.
.
.
मुझेभी तो पढ़ने दो माँ..
डाक्टर ना सही; कुछ तो बनने दो माँ!

- रसिका

Tuesday, December 23, 2014

बेरजा वजाबाक्या गुणाकार अन् भागाकार!




काही हिशोब सुस्पष्ट अन् ताजे
तर काही धुसर मागे सोडलेले...
काहींचे अस्तित्व जगाला दिसणारे
तर काहींचे ठसे मनावर उमटलेले...

- रसिका

Generation Gap!


''You are the sweetest person I have ever met !'' असं एका १५ वर्षाच्या ओळखीच्या मुलीनी तिच्या एका मित्रासाठी फेसबूक वर लिहिलेल वाचलं आज! दोघांनी एकमेकांबरोबरचे फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवल्येत. कमाल आहे! यांच्या वयाचे असताना आपण इतके बिनधास्त नव्हतो! गोष्टी खूप सोप्प्या झाल्येत या जेनरेशन साठी! माझ्या आणि माझ्या आई बाबांच्या पिढीतली Generation Gap स्वभावीक आहे.. पण माझ्याहून केवळ १० एक वर्ष लहान असलेल्या मुलांच्या आणि माझ्या पिढीमधे इतका फरक पडावा?? कुणाविषयी तरी स्वाभाविक आकर्षण वाटण्याच्या वयात असलेली ती मुलगी; ते आकर्षण इतक्या बिनधास्त जग जाहीर करत्ये याच आश्चर्य वाटत... कदाचित या गोष्टी इतक्या गंभीरपणे घेण्याच्या नसाव्यात त्यांच्या दृष्टीनी.. पण म्हणजे चांगल्या वाईटाच्या संकल्पनाच बदलत चाल्ल्येत का? की विचार परिपक्व होण्याची वाट न पाहाता या गोष्टींमधे पडणं हे " कूsssल " वाटतं यांना? नवीन पिढीला ( असं त्यांना संबोधताना खरच खूप त्रास होतो आतून ;) ) दोष द्यायचा हेतू अजिबातच नाहीये पण ही मानसिकता समजून घ्यायचा प्रयत्न आहे! :)

चलो बात करो !!

सब यहां दुख़ी है साले
खुश रेहेनेका बस ढोंग है करते!
मन में एक बात है छुपी,
जो खाये जा रही है अंदर ही अंदर..
नहीं! उसे बयान नहीं करेंगे लेकीन!
अभिमान जो हमारी टांग अडाता है!

प्यार करते हो, याद करते हो, तो बताते क्यूँ नहीं?
प्रेम तुम्हारा जताते क्यूँ नहीं?
है भी कोई अनबन तो उसे मिटाओ...
उलझे हुए रिश्तों को सुलझाओ!

जिंदगी इतनी छोटी है की
कब गुजर जाएगी पता भी न चलेगा
और तूम फिर भी वहीं पाओगे खुद को
उसी मोड़ पर!! मकड़ी के जाल में फसें हुए!!
रिश्तो को सुलझाने में नाकामयाब!!
.
.
.
नहीं चाहते हो ये अगर,
तो फिर उठो! चलो बात करो!!

- रसिका

Friday, November 7, 2014


फिर समेटना, फिर बिखरना..
बिखरे हुए टुकड़ो को समेटकर, एक नयीं तस्वीर बनाना..
और फिर एक दिन उसी तस्वीर को तोडकर कुछ नयी पेहेचान बनाना..
बार बार टुटकर जुडना क्या यही है जिंदगी ?

कब कहा कौनसा टुकडा क्या रंग दिखायें किसे है पता...
कब कहा कौनसा रिश्ता जुड जायें; या फिर टूंट जायें किसे है खबर!

टुकडों में बटें रिश्तें... माँ, बाप, भाई, बहन, दोस्त, गुरु, साथी...
हर एक का अपना चेहेरा, अपना स्वभाव..
रिश्ता निभाने की अपनी अपनी अदा..
बदलते टुकड़े ना जाने कौनसी नयी मंज़िल दिखायें
या फिर एक नयी उलझन में डालदें ?

इस टुकड़ो में बटीं जिंदगी को सलाम!!

-रसिका

Wednesday, October 15, 2014

दिवस आजचा


निळ्या शाईच्या कौतुकाचा
सेल्फीज च्या पोस्ट्सचा
शिक्षकांच्या ड्युटीचा
पोलिसांवरच्या ताणाचा
कार्यकत्यांच्या लगबगीचा
उमेदवारांच्या धाकधुकीचा
जागृतांच्या कर्तव्याधिकाराचा
अलिप्तांच्या सुट्टीचा
नेत्यांच्या चुप्पीचा
सेलिब्रेटींच्या अंगुलीदर्षक फोटोसेशनचा
न्युज चॅनेल्सच्या उधाणलेल्या चर्चांचा
तज्ञांच्या अंदाजांचा
लोकशाहीच्या उत्सवाचा


दिवस आजचा... मतदानाचा!

- रसिका