माझी खात्री आहे की आपल्या आजुबाजुची आणि विविध कारणांमुळे संपर्कात आलेली माणसं आपल्याला घडवत असतात, समृद्ध करत असतात! ही सर्व मंडळी आपल्यावर विश्वास ठेवतात, आपल्याला संधी देतात म्हणून आपण काहीतरी करू शकतो.. नवीन उमेद देणारी ही माणसं असतात म्हणुन अनेक बर्या वाईट प्रसंगांवर, लहान मोठ्या पराभवांवर आपण मात करतो... मग नाती रक्ताची आहेत की जोडलेली हा मुद्दा गौण होतो.. या फोटो मधल्या आणि त्या बाहेरच्या अनेक लोकांनी मला खूप भरभरून दिलय... काहींच्या लेखनातून, विचारांमधून, काहींच्या मार्गदर्शनातून, काहींच्या सहवासातून, वागणुकीतून, निखळ प्रेमातून, काहींशी झालेल्या संवादातून; ते conviction नी करत असलेल्या त्यांच्या कामातून तर काहींच्या मैत्रीतून मी सतत काहीतरी घेत आल्ये.. जग जर 'देणारे' आणि 'घेणारे' अशा दोन प्रकारच्या माणसांचे बनलेले असेल तर मी नक्कीच घेणार्यांमधे येते... कधीतरी आपल्या कामातून माझी वर्णी 'देणार्यांमधे' लागावी अशी इच्छा आहे... पण तोवर माझं जगणं तुमच्या प्रेमानी, मायेनी, सोबतीनी समृद्ध करणार्या, त्यात विविध रंगं भरणार्या तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा... :D
Thursday, January 1, 2015
रंगं भरणारी माणसं..... :)

Subscribe to:
Post Comments (Atom)
खुप छान. आत पोचले......
ReplyDeleteThank you Gokul Sir :)
ReplyDelete