पुन्हा कोषात जाऊ पाहणार्या फुलपाखराला अडवुन फुल म्हणतं; '' अरे थांब लेका.. कधी काळी माझ्याही मनात असा विचार येऊन गेला होता... पुन्हा कळी होण्याचा! पण एकतर खरच प्रॅक्टिकली तसं करण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही आणि निव्वळ मनानी तसं करून प्रश्न सुटत नाहीत! तेव्हा आता झटकून टाक हा राग.. जगावरचा.. पंखांमध्ये खूप सामर्थ्य आहे तुझ्या! नवीन आणि सुंदर फुलांना शोधण्याची क्षमता आहे... नव्या वाटा शोधताना थकलास तर थोडा विसावा घे जरूर; पण हतबल होऊन प्रयत्न करणे मात्र थांबवू नकोस! प्रयत्न करून हरलास तरी चालेल पण प्रयत्न सोडून दिवस रेटू नकोस! ''
रसिका
No comments:
Post a Comment