Saturday, July 26, 2014


पुन्हा कोषात जाऊ पाहणार्‍या फुलपाखराला अडवुन फुल म्हणतं; '' अरे थांब लेका.. कधी काळी माझ्याही मनात असा विचार येऊन गेला होता... पुन्हा कळी होण्याचा! पण एकतर खरच प्रॅक्टिकली तसं करण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही आणि निव्वळ मनानी तसं करून प्रश्न सुटत नाहीत! तेव्हा आता झटकून टाक हा राग.. जगावरचा.. पंखांमध्ये खूप सामर्थ्य आहे तुझ्या! नवीन आणि सुंदर फुलांना शोधण्याची क्षमता आहे... नव्या वाटा शोधताना थकलास तर थोडा विसावा घे जरूर; पण हतबल होऊन प्रयत्न करणे मात्र थांबवू नकोस! प्रयत्न करून हरलास तरी चालेल पण प्रयत्न सोडून दिवस रेटू नकोस! ''

रसिका

Friday, June 27, 2014

ब्युटी स्पॉट!

   ल्ली सगळ्या गोष्टींवर आपण सतत उतारे किंवा ठोस उपाय शोधत असतो... म्हणजे अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते मानसिक दुखण्यांपर्यंत ( इथे मानसिक विकार अभिप्रेत नाहीत! ) ......... कोणाचीतरी प्रचंड आठवण येऊन अस्वस्थ वाटतं किंवा कुठलातरी अपेक्षाभंग मनाला खूप त्रास देत असतो... खुपत असतो... कधीतरी वाटतं अशा दु:खांवर मात करण्याऐवजी असु द्यावीत ती मनाच्या एका कोपर्‍यात. ती वेदना जिवंत ठेवावी. खरतर ती मुळापासून उखडून टाकणं कोणालाच शक्य नसतं... म्हणूनच ती नाहीच अस म्हणून तिचं अस्तित्व तरी नाकारू नये! या जखमा मनाला जागृत ठेवतात. अधिक संवेदनशील बनवतात... आणि पुढच्या वेळेस ठेच लागण्या आधीच सावधही करतात! त्यावर योग्य फुंकर घालणारी व्यक्ती जेव्हा मिळेल तेव्हा त्या वाहू द्याव्यातच पण एरवी देखील एकांतात त्यांना आपल्यावर सत्ता गाजवू द्यावी. म्हणजे त्या दु:खाला दडपून टाकण्यात आपली शक्ती व्यर्थ जात नाही.. ते दु:ख अनुभवून त्याचा निचरा झाल्यावर मनाला थोपटत म्हणावे ''आल इज वेल!!''
   येत असेल कोणाची आठवण तर ती येऊ द्यावी... विराहामुळे नात्यांची खोली आणि गोडी दोन्ही वाढते!! नात्यांना तपासून पाहता येते... त्याचा आकार आणि व्याप्ती कळते.
   शेवटी काय, दु:खाची, काळजीची काजळी असणारच आहे... फक्त तिला आपले आयुष्य व्यापू द्यावे की ब्युटी स्पॉट प्रमाणे तिचे अस्तित्व मान्य करत बाळगावे ही निवड आपलीच असणार आहे!

- रसिका

Monday, June 16, 2014


जब मैने भरोसा रखा दुनियापर, पुरानी मान्यताओंका नकाब हटाकर,
समझ आया की इंसानियत है सबकी खरी जात और है मझहब भी...
आदर, प्रेम, सम्मान तो सब मैं है समान... फर्क हैं तो सिर्फ रेहेन सेहेन, रिवाज और आदर्शों में ..
और फिर अंजाने लोगोंमेंभी मैने महफ़ूज़ मेहेसुस किया...

- रसिका

Tuesday, June 10, 2014


प्रत्येकाचे 'अभिमान' आणि प्रत्येकाची 'तत्व'!
प्रत्येकाच्या अपेक्षा अन् प्रत्येकाचे 'स्वातंत्र्य'!
आपापले स्वातंत्र्य जपायचा आज प्रत्येकाचा प्रयत्न,
मी म्हणेन तस समोरच्याने वागावे हा मात्र प्रत्येकाचाच आग्रह (बर्‍याचदा हट्ट!) !
मैत्री, प्रेम, जिव्हाळ्याच्या नात्यांना होतोय का या 'स्पेस' चा जाच?
की अजुन पुरेसे शिकायचोय आपण व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रॅक्टिकल?
की हा आहे पिढ्यांमधल्या वैचारीक अंतराचा मुद्दा?
माझ्यावर फक्त माझाच हक्क, मी माझा स्वतंत्र...
पण मग प्रेमाच्या ओलाव्यासाठी का आतून तुटतो इथे प्रत्येकजण?
अपेक्षाभंग इथे रोजचाच आणि प्रेमळ रुसव्या
फुगव्यांची जागा केव्हाच घेतल्ये धुसफूस आणि चिडचिडीनं.......
मनामनातल्या या शीतयुद्धाला आस आहे सामंजस्याची...
धुमसणार्‍या मनांना ओढ आहे शीतल, आश्वासक उबा-याची.....

- रसिका

Wednesday, March 12, 2014


आम्ही करतोय इथे मजा मस्तीचे सोहळे
माझा शेतकरी सखा झेली गारपिटीची वादळे....
आमचे जगणेच कोरडे, माती-पावसाशी आम्हा काय देणे घेणे ?
ज्यानी राखले मातीशीच इमानं; त्याला मात्र प्रकोपाचा मान !
घर्म बिंदूंनी मांडली ज्याने मातीची पूजा
आणि कष्टाने ज्याने फुलवला आपला मळा,
त्याच्याच माथी हाणी तो वरचा बाबा गारपिटीची काठी...
आम्ही कोरडे ते कोरडेच.. नामनिराळे, करू मस्तीचे सोहळे ........

- रसिका

Monday, March 3, 2014

वेड!!!


कधीतरी वाटत मला अशी फरफरा चित्र काढावीत लहान मुलांसारखी.... किंवा पळत सुटाव वार्‍यासारख...
किंवा रानोमाळ भटकावं अगदी स्वछंदी!! पिंजून काढावा देश गावोवाव भट्काव... कुपोषण म्हणजे नेमक काय.. अर्धापोटी जगणारी माणस पाहावीत जरा आपला कंफर्ट झोन सोडून... पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून (शब्दष:!) काम करणारी मी, घ्यावी जरा समजून तळागाळातल्या स्त्रीची व्यथा!!  कोण जाणे हे सगळं करता येईल की नाही... पण यातल्या काही गोष्टी तरी करता याव्यात आयुष्यात... तेवढे बळ एकवटूदेत!!

Friday, February 14, 2014

ना बनाओ अपने दिल को शीशेसा नाज़ुक यारों....
पाओगे उसे टूटा हूआ गम की एकही लकीर से.......

नाहीं बनाओ उसे पत्थर जैसा सख़्त,
जिसतक जसबाद पोहोच ही ना सके...

बनाओ उसे शंख जैसा ज़िंदादील और गेहेरा,
अगर कोई साद दे तो प्रतिसाद दे सके;
और कोई ध्यान से सुननेवाला मिलें, तो अपने गेहेरे राज़ खोल सके....

- रसिका